Vajramuth Sabha : 'मविआ' ची आज वज्रमूठ सभा, छत्रपती संभाजीनगर मध्ये राजकीय वातावरण तापले



ब्युरो टीम : शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीची राज्यातील पहिली संयुक्त सभा आज संभाजीनगरमध्ये होत आहे. एकीकडे मविआच्या जाहीर सभा होत असताना दुसरीकडे भाजपा-शिंदे गटाकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये सावरकर गौरव यात्रा काढली जात असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या मविआच्या ‘वज्रमूठ’ सभेविषयी कमीलीची उत्सुकता निर्माण झाली आहे. ही राज्यातील सरकार कोसळल्यानंतर पहिल्यांदाच मविआची जाहीर संयुक्त सभा असल्यामुळे राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदावे झाल्याचं दिसून आलं.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह मविआचे अनेक दिग्गज नेत्यांच्या हजेरीत ही सभा पार पडणार आहे. यावेळी अवकाळी पाऊस, संभाजीनगर हिंसाचार, सुप्रीम कोर्टातील सुनावणी, पीकविमा आणि महागाईसह भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झाले आहे. थोड्याच वेळात ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभेसाठी दाखल होणार आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे मंचावर दाखल झाले आहे. संभाजीनगर येथील मराठवाडा मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या सभेला महाविकास आघाडीच्या नेत्यांसह असंख्य कार्यकर्ते सभास्थळी जमा होत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने