Vidhansabha : भाजप उमेदवारांची यादी उद्या जाहीर होणार; मुख्यमंत्री आज संध्याकाळी नवी दिल्लीला रवाना



ब्यूरो टीम: भाजपच्या राज्य निवडणूक समितीने 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात तीन नावे निवडली आहेत आणि संसदीय मंडळाच्या 8 एप्रिल रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत यातील अंतिम यादीला मंजुरी दिली जाणार आहे, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज दिली.

कर्नाटकात अन्य प्रमुख पक्षांनी त्यांचे बहुतांश उमेदवार जाहीर केले असले तरी अजून भाजपकडून एकही नाव जाहीर न झाल्याने इच्छुकांमध्ये मोठीच हलचल आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 13 एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल अशी आहे. कॉंग्रेसने एकूण 224 जागांपैकी 166 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत, तर जेडीएसने 93 उमेदवारांची एक यादी जाहीर केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने