Vishalganpati :श्री विशाल देवस्थानच्यावतीने सामाजिक संस्थांना आब्यांचा प्रसाद



 ब्युरो टीम : श्री विशाल गणेशाच्या कृपेने सर्वच उत्सव आता मोठ्या प्रमाणात साजरे होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला श्री विशाल गणेश मंदिरात भाविकांनी दिलेल्या आंब्यांच्या प्रसादाचा नैवद्य दाखविण्यात आला होता. मोठया आकर्षक पद्धतीने श्री विशाल गणेशाची आंब्यांची पुजा बांधण्यात आली होती. या आंब्यांचे दान सत्कारणी लावण्याच्या उद्देशाने अनामप्रेम संस्था व महात्मा फुले विद्यार्थी गृहातील मुलांना हा आंब्यांचा प्रसाद देण्यात आला. समाजातील वंचित घटकांसाठी काम करणार्‍या संस्थेप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. आज सामाजिक संस्थांना मदतीचा हात देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन श्री विशाल गणेश देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी केले.

     श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने अक्षयतृतीये निमित्त भाविकांच्यावतीने देण्यात आलेल्या नैवेद्याचे आंबे अनामप्रेम संस्था व महात्मा फुले विद्यार्थी वसतीगृहातील मुला-मुलींना देण्यात आले. याप्रसंगी पुजारी संगमनाथ महाराज, देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, विश्वस्त पांडूरंग नन्नवरे, गजानन ससाणे, रंगनाथ फुलसौंदर, विजय कोथिंबीरे, संजय चाफे, नितीन पुंड, अर्जुन बोरुडे, गणेश राऊत आदि उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने