Agriculture:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता मल्चिंग पेपरसाठी 50 टक्के अनुदान मिळणार, असा घ्या लाभ..



ब्युरो टीम : सध्या आधुनिक शेती केली जात आहे. भाजीपाला, फळबागा तसेच अनेक वेगवेगळ्या पिकांसाठी अच्छादन म्हणून मल्चिंग पेपर चा वापर केला जातो. मल्चिंग पेपरच्या वापरामुळे शेतात तणांची वाढ होत नाही. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो. त्यामुळे तण काढणीच्या खर्चात बचत होते. तसेच उनामुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. सध्याच्या काळात या प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर वाढत असल्याने मल्चिंग पेपरसाठी अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेंतर्गत मल्चिंग पेपरसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे. मल्चिंग पेपर वापरासाठी ३२ हजार रुपये खर्च येतो. या अभियानांतर्गत खर्चाच्या ५० टक्के जास्तीत-जास्त म्हणजेच १६ हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे कमाल दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदान दिले जाते.

यामध्ये शेतकरी वैयक्तिक लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे शेतकरी समूह, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट, सहकारी संस्था यांना अर्थसहाय्य केले जाते. यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे.

योजनेच्या लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्जासाठी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.

यासाठी शेतजमीनीचा सातबारा, ८ अ, आधार कार्डची छायांकीत प्रत आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, अशी कागदपत्रे लागणार आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने