ब्युरो टीम: अंबरनाथ रेल्वे स्थानकावर नेहमीप्रमाणे वर्दळ
होती. शेकडो प्रवासी आपापल्या गंतव्यस्थळी जात होते. प्रत्येकजण आपल्याला हव्या
असणाऱ्या रेल्वे गाडीने जात होते. काहीजण रेल्वे गाडीची वाट पाहत होते. यावेळी अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरात मोठी आग लागल्याची घटना समोर आलेली. आगीच्या
घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या दरम्यान अचानक आगीची घटना घडली आणि एक
तास खोळंबा झाला. आग
लागली त्या परिसरात धुराचे मोठे लोळ उसळले. त्यामुळे रेल्वे स्थानकावर आलेल्या
प्रवाशांना धडकी बरली. संबंधित घटना नेमकी का घडली? ते सुरुवातीला समजत नव्हते. आग लागल्यानंतर तातडीने यंत्रणा
कामाला लागली. थोड्यावेळाने अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.
आगीच्या घटनेमुळे
कर्जतकडे जाणारा रेल्वे मार्ग बंद झाला. हा मध्य रेल्वेला मोठा फटका आहे. कारण ही
वेळ गर्दीची असते. लाखो प्रवाशी आपापल्या कार्यालयांतून घरी जायला निघतात. अशावेळी
रेल्वे वाहतूक संथ गतीने चालत असेल तर प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं
लागतं. संबंधित घटनेमुळे रेल्वे स्थानकावर तासभर रेल्वे गाडी उभी होती. प्रवाशांची
प्रचंड गर्दी फलाटावर बघायला मिळाली.
नेमकं काय घडलं?
अंबरनाथ रेल्वे स्थानकात
कर्जत दिशेला रेल्वे रुळाच्या बाजूलाच रेल्वेची इलेक्ट्रिक साहित्य ठेवण्याची
केबिन होती. या केबिनमध्ये असलेल्या वायर्सला आज दुपारच्या सुमारास अचानक आग
लागली. या आगीमुळे धुराचे लोट मोठ्या प्रमाणात निघू लागले. त्यामुळे कर्जतकडे
जाणारा रेल्वे मार्ग बंद करण्याची वेळ रेल्वेवर आली.
या आगीची माहिती मिळताच
अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र यामुळे कर्जतकडे
जाणाऱ्या रेल्वे मार्ग तासाभर बंदच होता. अंबरनाथ रेल्वे स्थानकात एक मेल
एक्सप्रेस उभी करून ठेवण्यात आली होती.
टिप्पणी पोस्ट करा