Bacchukadu: मंत्रिमंडळ विस्तारची चर्चा सुरु ; मलाही मंत्रिपद मिळणार बच्चू कडूचा दावा



ब्युरो टीम: राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा बहुप्रतिक्षित निकाल काल जाहीर झाला. त्यानुसार राज्यातल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मोठा दिलासा मिळाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर आता दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे.

अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. 20 ते 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं बच्चू कडू म्हणाले. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे, त्यामुळे मलाही मंत्रिपद मिळणार, असा दावाही बच्चू कडू यांनी केलाय. ते एबीपी माझाशी होते.

बच्चू कडू पुढे म्हणाले की, आता मंत्रिमंडळ विस्ताराला कोणतीही अडचण नसावी. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे. लोकांची कामे निकाली निघावीत यासाठी लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे. माझ्या कानावर आलंय की 20 किंवा 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि गरजेचं पण आहे. आमच्यासाठी नाही तर जनतेसाठी फार महत्त्वाचं आहे. एकेका मंत्र्याला पाच ते सहा पालकमंत्रिपद आणि तर खाती दिल्याने लोकांची म्हणावी तशी कामं होत नाहीत. कोणाला मंत्री बनवतात हा नंतरचा भाग पण विस्तार होणं महत्त्वाचं आहे. आता विस्तार झाला नाही तर मग 2024 नंतरच विस्तार होईल असं मला वाटतं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने