Bjp: भाजपाच्या कार्यकारिणीत मुरलीधर मोहोळ, माधव भंडारी यांच्यासह नव्या चेहऱ्यांना संधी



ब्युरो टीम: राज्यात येणाऱ्या निवडणुकांसाठी सर्वपक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. भाजपकडूनही तयारी सुरू आहे, आज भाजपमध्येही मोठे बदल केले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

आता नवे १६ उपाध्यक्ष आणि १६ सचिव कोषाध्यक्ष १, महासचिव ५ अशा नव्या पदाधिकाऱ्यांची नावे आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. यात पुण्यातील मुरलीधर मोहोळ, माधव भंडारी यांना संधी देण्यात आली आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसातच होणार आहेत. या निवडणुकांची तयारी जोरदार सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता पक्षात नव्या पदाधिकाऱ्यांना संधी दिली आहे. भाजपकडून २८८ विधानसभा मतदार संघासाठी ही नवी यादी जाहीर करण्यात आली आहे.

कोकणातून उपाध्यक्षपदासाठी माधव भंडारी तर मुरलीधर मोहोळ यांची पश्चिम महाराष्ट्रतून सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नव्या पदाधिकाऱ्यांना आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचना दिल्या.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आम्ही राज्यातील जनतेपर्यंत पोहोचणार आहोत. आमचे जिल्हाधिकारी, तालुकाप्रमुख एक कोटी घरापर्यंत पोहोचणार आहेत. केंद्र सरकारची काम जनतेपर्यंत पोहोचावीत म्हणून सरळ अॅप सुरू करत आहोत. केंद्रातील आणि राज्यातील या डबल इंजिन सरकारच्या कामाची माहिती जनतेला देणार. राज्याकील ४८ लोकसभा आणि २०० विधानसभेचे मतदारसंघाच्या महाविजयाचा आम्ही संकल्प पूर्ण करणार आहे, नव्या पदाधिकाऱ्यांना दिलेली जबाबदारी ते व्यवस्थीत पार पाडतील असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने