Bjp : भाजपात अंतर्गत बदलला वेग, मुंबईत बैठक

 


ब्युरो टीम : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच आता आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. तीन दिवसांपूर्वी पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपचे राज्यातील सर्व संघटनेतील पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते

या बैठकीनंतर आता मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर भाजपमध्ये संघटनात्मक बदलांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर आता मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे

ही बैठक आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीनंतर भाजपमध्ये काही संघटनात्मक बदल केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.तर आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपकडून मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी मिशन 145 आखण्यात आले आहे. याअतंर्गत मुंबई महापालिकेत दिडशे जागा जिंकून सत्ता मिळवण्याचं भाजपचं नियोजन आहे

मुंबई महापालिका निवडणूक भाजप युतीत लढण्याची शक्यता आहे. मात्र भाजप नेत्यांकडून मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून, त्यासाठी बूथ लेव्हलचं नियोजन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक महत्त्वाची असल्याचं म्हंटलं जात आहे. या बैठकीनंतर संघटनात्मक स्थरावर काही बदल करण्यात येण्याची शक्यता आहे

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने