Chaganbhujbal: राष्ट्रवादीनं आघाडीतून बाहेर पडावं का? भुजबळांचा राऊतांना संतप्त सवाल



ब्युरो टीम: आजच्या सामनाच्या संपादकीयमधून शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे. या टीकेचा राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांनी चांगलाच समाचार घेत संजय राऊत यांना सुनावलं आहे.

शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकात जे काही म्हटलं आहे, त्यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्टीकर दिलं आहे. मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मग संजय राऊत यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे, असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला आहे. नेमकं काय म्हणाले भुजबळ? पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही असं उद्धव ठकारे यांनी म्हटलं आहे.

मग संजय राऊत यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे. त्यांना काय अडचण आहे. त्यांना असं वाटतं का की राष्ट्रवादीनं महाविकास आघाडीतून बाहेर पडावं? मनभेद निर्माण व्हावेत. राऊत यांचं जेवढं आयुष्य आहे तेवढा शरद पवार यांचा राजकीय अनुभव आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. ...'तर आज ही वेळ आली नसती' दरम्यान संजय राऊत यांनी इतकं लक्ष शिंदे ग्रुप आणि त्यांच्या बॅगांवर ठेवलं असतं तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. राष्ट्रवादीमध्ये सुद्ध अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील असे अनेकजण नेतृत्व करण्यास सक्षम असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने