Chandrashekharbanavkule: कर्नाटक निकालाची महाराष्ट्र भाजपला धास्ती; आखला मास्टर प्लन ; बावनकुळे म्हणाले



ब्युरो टीम: कर्नाटकमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे. भाजपला पराभवाची धूळ चारत राज्यात काँग्रेसनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

काँग्रेसच्या या विजयावर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकमधील पराभवानंतर भाजपने आगामी लोकसभेसाठी आत्तापासून मोर्चेबांधणी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. याबद्दल बावनकुळे यांनी माहिती दिली. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले बावनकुळे? कर्नाटक परभवानंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की कर्नाटकात भारतीय जनता पक्षाला पराभव पत्करावा लागल्यानंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षातर्फे लोकसभा आणि विधानसभेच्या 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी 25 लाख युवा वॉरियर्स तयार करण्यात येणार आहेत. 18 ते 25 वयोगटातील सक्रियपणे काम करणारे हे कार्यकर्ते असतील. युवकांकरिता आणि खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभर नमो चषक स्पर्धा होणार आहेत. महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या असल्यामुळे उशिरा होत आहे.

त्यांच्यामुळे निवडणुका लांबल्या आहे. भाजपमुळे निवडणुका लांबल्या नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टातील केसेस परत घेतल्या तर कधीही निवडणूक लागू शकतात, असंही बावनकुळे म्हणाले. दरम्यान, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होणार नाही.

विरोधकांनी ग्रामपंचायत निवडणूक जिंकली तरी त्यांना राज्यात आपलीच सत्ता येईल असं वाटतं, असा टोलाही बावनकुळे यांनी विरोधकांना लगावला आहे. कोण होणार मुख्यमंत्री? कर्नाटकमध्ये ऐतिहासिक कामगिरीनंतर काँग्रेससमोर नवं आव्हान निर्माण झालं आहे. मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यातून कुणाची निवड करायची?

हा संघर्षाचा मुद्दा असणार आहे. सिद्धरामय्या अनुभवी आहेत. त्यांच्याकडे सरकार चालविण्याचाही अनुभव आहे. सिद्धरामय्या 2013 ते 2018 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री होते.

तर डी. के. शिवकुमार आव्हान स्वीकारणारे नेते आहेत. तसंच सोनिया गांधी यांची मर्जी राखणारे नेते असल्यानं त्यांचं पारडं जड मानलं जातं आहे.

 

काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात मुख्य लढत आहे. मात्र, आतापर्यंत मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिलेले काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांचंही नावही समोर येऊ शकतं.

नावावर सहमती झाल्यास खरगे यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छापूर्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्नाटकात विविध मंत्रिपदे, केंद्रात मंत्रिपद, लोकसभेचे गटनेतेपद अशी विविध पद खरगे यांनी भुषवली आहेत. आता काँग्रेस हायकमांड कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने