Chatrapathi : एस.एस राजामौलीं व प्रभासच्या 'छत्रपती'चा ट्रेलर आऊट; अल्पावधीतच मिळाले लाखो व्ह्यूज



ब्युरो टीम:  दाक्षिणात्य कलाकारांना आता बॉलिवूडची भूरळ पडत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे.आता तेलुगू अभिनेता बेलमकोंडा श्रीनिवास 'छत्रपती' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'छत्रपती' हा 2005 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेलुगू भाषेत प्रदर्शित झालेला हा सिनेमा एस.एस राजामौलींनी प्रदर्शित केला होता. या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि श्रिया सरन मुख्य भूमिकेत होते. त्यावेळा हा सिनेमा चांगलाच गाजला. आता या सिनेमाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'छत्रपती' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अॅक्शन, थरार, नाट्य आणि रोमान्स पाहायला मिळत आहे. या सिनेमातील डायलॉग प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे आहेत. "अपने लिए तो हर कोई जीता है, लेकिन जो औरों के लिए जीता है उसे छत्रपती कहते है", असे डायलॉग या सिनेमात आहेत. अल्पावधीतच या ट्रेलरला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. बेलमकोंडा श्रीनिवासचा अॅक्शनमोड ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने