Congress: कॉंग्रेसचा सोलापुरात 'एकला चलो रे'चा नारा; ठेवलाय राष्ट्रवादीच्या लोकसभा मतदार संघावर डोळा



ब्युरो टीम:  कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दणदणीत असा विजय मिळवला. यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला आहे.

कर्नाटक येथील यशानंतर सोलापुरात काँग्रेस पक्षाचा निर्धार महामेळावा पार पडला. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह दिग्गज काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावली. महाराष्ट्रातील विधानसभा, लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेत्यांनी चाचपणी सुरू केली आहे. सोलापुरातील निर्धार महामेळाव्यात सोलापूरसह माढा लोकसभेसंदर्भात कामाला लागण्याचे आदेश प्रदेशाध्यक्षने दिले आहेत.

मागे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसच्या मतदारसंघावर दावा सांगितला होता. आता काँग्रेसने राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर दावा केला आहे. काँग्रेसचा एकला चलो रेचा नारा विधानसभेत सध्या 44 काँग्रेसचे आमदार आहेत. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून राज्याचा दौरा करत आहे.

गेल्या पंधरा दिवसात सोलापूर जिल्ह्यात दोनदा नाना पटोले यांचा दौरा झाला. महाविकास आघाडी सोडून काँग्रेसने 288 तसेच 48 लोकसभा मतदारसंघ संदर्भात चाचपणी सुरू केली आहे. कर्नाटकातील मिळालेलं यश राज्य काँग्रेसला उभारी देणारे ठरत आहे. शिवसेना ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस यांना सोबत घेऊन जाण्याची भाषा करत आहेत.

तर सोलापुरातील झालेल्या मेळाव्यात काँग्रेसकडून एक ला चलो रेचा नारा दिला आहे. काँग्रेसचा राष्ट्रवादीला संदेश सोलापुरातील काँग्रेस पक्षाच्या निर्धार मेळाव्यात नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या आदेश दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा दोन लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा लावण्याचा निर्धार केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मरगळलेली काँग्रेसला नवीन संजीवनी देण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या मेळाव्यातून दिसून आला.

यातून राष्ट्रवादी काँग्रेसलाही संदेश देण्याचे काम काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केले आहे. सोलापूर लोकसभेवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडाजंगी झाली होती. रोहित पवार आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्यात यामुळे खटका उडाला होता. सोलापूर जिल्ह्यात सध्या भाजपचे वर्चस्व आहे.

भाजपचे सात आमदार तर दोन लोकसभा खासदार आहे. एकेकाळी सोलापूर काँग्रेसचा लोकसभा गड होता. मोदी लाटेत सुशीलकुमार शिंदे यांचा लोकसभेत दोनदा पराभव झाला. निर्धार मेळाव्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाचा आग्रह सोलापूर लोकसभेसाठी धरला आहे. नाना पटोले यांनी त्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने