cyber cell: लग्नात सायबर जनजागृतीचे पोस्टर लावत जोपासली सामजिक बांधिलकी; सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक रणशेवरे यांचा पुढाकार




ब्युरो टीम: सामाजिक बांधिलकी जपत वधू पित्याकडून लग्न समारंभात सायबर जनजागृतीचे पोस्टर्स लावून साजरा केला आहे अनोखा उपक्रम;सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक रणशेवरे यांनी सायबर संदर्भात दिली माहिती

आजच्या युगात सायबर फ्रॉडचे प्रमाण खूप वाढले आहेत.याच अनुषंगाने दि.१६ मे रोजी श्री.राजेंद्र पोपटराव बळे यांच्या मुलीच्या विवाहप्रसंगी नगर कल्याण रोडवरील महालक्ष्मी लॉन्स येथे बळे कुटुंबीयांनी समाजामध्ये सायबर फ्रॉडची जनजागृती व्हावी म्हणून लग्न समारंभामध्ये सायबर जनजागृतीचे पोस्टर लावून सायबर जनजागृतीचा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला.यावेळी सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक रणशेवरे म्हणाले की,या सायबर फ्रॉडच्या युगात सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक तेढ खूप निर्माण झाले आहेत व या पोस्ट आजकालचे तरुण सोशल मीडियावर टाकतात आणि याच माध्यमातून दंगलीचे वातावरण तयार झाले आहे.याच्यावर आळा बसावा समाज माध्यमांमध्ये एकोपा निर्माण व्हावा आणि सायबरच्या माध्यमातून जे फ्रॉड आजकाल घडत आहे त्याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी या लग्नामध्ये जो सायबर जनजागृतीचा अनोखा उपक्रम राजेंद्र बळे परिवाराने राबवला तो कार्यक्रम समाजामध्ये एक चांगला संदेश देत आहे.तसेच या स्तुत्य उपक्रमाचे अनेकांनी अनुकरण करणे आवश्यक आहे असेही रणशेवरे यावेळी म्हणाले.



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने