Guptetirhekhupte: आता खुपणार नाही तर टोचणार; खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाला होणार सुरुवात



ब्युरो टीम: छोट्या पडद्यावरील काही कार्यक्रमांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते. यातील काही कार्यक्रमांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.छोट्या पडद्यावरील काही कार्यक्रमांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते.

यातील काही कार्यक्रमांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमांनी टीआरपीच्या शर्यतीतदेखील बाजी मारली आहे. असाच एक कार्यक्रम म्हणजे 'खुपते तिथे गुप्ते'. खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम आता लवकरच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आहे. तर खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. तब्बल १० वर्षांनी अवधूत गुप्तेचा टॉक शो येत आहे.

मराठी गायक, संगीतकार अवधूत गुप्तेचा प्रसिद्ध टॉक शो म्हणून 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमाकडे पाहिले जाते. या कार्यक्रम चांगला लोकप्रिय ठरला होता. या कार्यक्रमाचे पहिले दोन्हीही पर्व चांगलेच गाजले होते. पण त्यानंतर काही वर्ष हा कार्यक्रम बंद करण्यात आला. आता हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी मराठीने नुकतंच या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमो व्हिडीओची सुरुवात अवधूत गुप्तेच्या बोलण्यावरुन होते. "ही खुर्ची देशाचं भविष्य घडवते, ही निर्दोषांना न्याय मिळवून देते, ही माणसाचा जीव वाचवते आणि ही खुर्ची प्रश्न विचारते. हिच्या प्रश्नांनाही खूप धार आहे, या खुर्चीवर बसायला कोण-कोण तयार आहे. आता खुपणार नाही तर टोचणार", असे अवधूत गुप्ते यावेळी बोलताना दिसत आहे.

खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या माध्यमातून अवधूत गुप्ते खुपणारी गोष्ट समोर आणणार आहे. 'खुपते तिथे गुप्ते'चं हे पर्व वेगळं असणार आहे. या पर्वाचं खास आकर्षण एक खास खुर्ची असणार आहे. या खुर्चीसाठी सगळीकडे चढाओढ पाहायला मिळणार आहे. नोकरदार, कॉर्पोरेट आणि राजकारणी मंडळींमध्ये खुर्चीसाठीची ही चढाओढ पाहायला मिळणार आहे. तर अवधूत गुप्ते हे बिनचूक प्रश्न विचारून त्यांच्या मुळाशी हात घालताना दिसतात. त्यामुळे साधारणतः खुपते तिथे गुप्ते या टॉक शो मधून त्यांच्या मुळावर हात घातला जातो

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने