Health: 5 मिनिटात अँग्झायटी दूर करते हे मेडिटेशन



ब्युरो टीम: मेडिटेशन हे विचार सद्य:स्थितीत केंद्रित करते, यामुळे अँग्झायटी वेगाने कमी होते मेडिटेशन दरम्यान डोळे, त्वचा, कान, नाक आणि स्वाद इंद्रिय म्हणजे जिभेचाही समावेश केला तर अँग्झायटीला ५ मिनिटात दूर केले केले जाऊ शकते. अमेरिकेच्या वैद्यकीय व शैक्षणिक सायकोलॉजिस्ट सामंथा स्नोडेन यांच्या नुसार हे ५ सेन्सेस मेडिटेशन विचारांना सद्य:स्थितीत केंद्रीत करते. यामुळे अँग्झायटी वेगाने घटते. चांगली गोष्ट अशी की, कोठेही सहजपणे करू शकता. एखाद्या मोकळ्या ठिकाणी केल्यास अधिक चांगले.

असे करा : आरामशीर मुद्रेत बसा. आता दोन, तीन वेळा नाकाने दीर्घ श्वास घ्या. या वेळी श्वास शरीरात जाताना व बाहेर जातांना जाणीव करा. यानंतर सामान्यपणे श्वास घेणे सुरू करा. आता ५ सेन्सची जाणीव करा.

डोळे : आजूबाजू बारकाईने बघा. काही असे शोधा जे तुम्ही आधी पाहिले नसेल किंवा ज्याकडे कधी लक्ष गेले नसेल. एक मिनिटापर्यंत जवळपासच्या वस्तूंकडे लक्ष द्या.

त्वचा : आता डोळे बंद करा. जेथे बसला अाहात त्या जागेला पायांनी स्पर्श करा. हाताने पाय अनुभवा. वातावरणाच्या तापमानाची त्वचेवर जाणीव करा. असे १ मिनिट करा.

कान : डोळे बंद ठेवा. शांत मनाने आजूबाजूचे आवाज ऐकण्याचे प्रयत्न करा. जेवढे वेगवेगळे आवाज ऐकू शकता तेवढे ऐका.

नाक : एक दीर्घ श्वास घ्या. हवेतील कोणत्याही सुगंधाची जाणीव करा. तो हलका, मंदही असू शकतो. १ मिनिट जाणीव करा. जीभ : आता शेवटी तोंडाच्या स्वादाची जाणीव करण्याचे प्रयत्न करा. जर एखादा स्वाद नसला तरी काही अडचण नाही. फक्त जाणून घेण्याचा प्रयत्न करा

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने