health: एका जागी सारखे बसू नका; आहेत ‘या’ आजाराची लक्षणे



ब्युरो टीम:  खूप वेळापर्यंत एकाच ठिकाणी बसून राहणे आरोग्यासाठी चांगलं नसतं पण हल्ली बदलती लाईफस्टाईल, ऑनलाईन काम, वर्क फ्रॉम होम यामुळे अनेकदा आपण आठन् आठ तास बसून काम करावं लागतं. त्यामुळे याचा दुष्परीणाम आपल्याला भोगावा लागतो.

तुम्हाला माहिती आहे का खूप वेळ एकाच जागी बसून राहल्याने काही गंभीर आजार होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया.

खूप वेळ एकाच जागी बसून राहल्याने मन स्थिर राहत नाही. याशिवाय तीव्र डोकेदुखी, मानसिक आजार होण्याचीही शक्यता असते.

एकाच ठिकाणी तासन् तास बसून राहल्याने तुम्हाला आजार होण्याचा धोका वाढतो. ज्यामुळे तुमचं वय कमी होऊ शकतं.

जर तुम्हाला आधीच गंभीर आजार असेल किंवा लठ्ठपणा किंवा मधूमेहासारखे आजार असेल तर तुम्ही चुकूनही जास्त वेळ एकाच जागी बसू नये.

लठ्ठपणाचं हे सर्वात मोठं कारण असू शकतं. एकाच जागी बसून राहल्याने शरीराच्या हालचाली खूप कमी होतात ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो.

एकाच जागी बसून राहल्याने पाठ आणि मान दुखू शकते. पाठदुखी हा खूप मोठी समस्या आहे. भारतात ६० -७० टक्के लोकांना पाठीदुखीचा त्रास होतो.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने