Health: डोळ्याखाली काळी वर्तुळे आलीत; दह्याच्या 'या' पद्धतीने करा वापर



ब्युरो टीम: आजकाल डोळ्याखालील काळी वर्तुळे ही एक अतिशय सामान्य समस्या झाली आहे. अनियमित जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे प्रत्येक दुसरा व्यक्ती या समस्येला झुंज देत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र, या उत्पादनांचा वापर करणे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्ही दह्याचा वापर करू शकतात. दह्याचा वापर केल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. डोळ्याखालील कार्य वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्ही दह्याचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

दही

डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी दही फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला दही डोळ्यांखाली लावून हलक्या हाताने मसाज करावी लागेल. साधारण दहा ते पंधरा मिनिटे मसाज केल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. नियमित दह्याचा वापर केल्याने डोळ्याखालील काळी वर्तुळे हळूहळू दूर होऊ शकतात.

दही आणि हळद

तुम्ही जर डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी उपाय शोधत असाल, तर दही आणि हळदीची पेस्ट तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये एक चमचा दही आणि एक चमचा हळद मिसळून घ्यावी लागेल. त्यानंतर या मिश्रणामध्ये तुम्हाला एक चमचा लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते डोळ्याखाली साधारण दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा धुवावा लागेल. रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हे मिश्रण डोळ्याखाली लावावे लागेल.

 

 

दही आणि कोरफड

त्वचेच्या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी कोरफडीचा वापर केला जातो. त्याचबरोबर डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी तुम्ही कोरफड आणि दह्याचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा दह्यामध्ये एक चमचा कोरफडीचा गर मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण दहा ते पंधरा मिनिटं डोळ्याखालील काळ्या वर्तुळांवर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने डोळ्याखालील काळी वर्तुळे सहज दूर होऊ शकतात.

डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्ही वरील पद्धतीने दह्याचा वापर करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचा चहा प्यायल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

शरीर थंड राहते

उन्हाळ्यामध्ये पुदिनाचा चहा प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. पुदिनाचा चहा प्यायल्याने तुम्ही दिवसभर ताजतवाने राहू शकतात. याच्या नियमित सेवनाने तुम्ही थकवा, अंगदुखी इत्यादी समस्यांपासून दूर राहू शकतात. त्याचबरोबर उष्णतेमुळे होणारी जळजळ शांत करण्यासाठी पुदिनाच्या चहाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

ऍसिडिटीपासून आराम मिळतो बहुतांश लोकांना पोटात गॅस आणि ऍसिडिटीची समस्या निर्माण होते. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी पुदिनाच्या चहाचे सेवन करू शकतात. पुदिन्याच्या चहामध्ये आढळणारे घटक पोटातील उष्णता कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर दररोज याचे सेवन केल्याने ऍसिडिटीपासून आराम मिळतो.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने