ब्युरो टीम: शरीरातील जीन्स बदलता येत नाहीत, पण आहारातील बदलांसोबत आरोग्यदायी सवयी लावून आयुर्मान
वाढवता येते. कोलंबिया विद्यापीठातील नॅशनल सेंटर ऑन अॅडिक्शन अँड सबस्टन्स अॅब्युजच्या
मते, जी मुले आणि किशोरवयीन
आठवड्यातून तीन किंवा अधिक जेवण आपल्या कुटुंबासह घेतात त्यांचे आरोग्य अधिक
चांगले असते. इतकंच नाही, तर ते अभ्यासात
उत्तम तर असतातच, पण ते ड्रग्जला
बळी पडण्याची शक्यताही कमी असते. द ब्लू जोन्स अमेरिकन किचन या पुस्तकाचे लेखक डॅन
बटनर यांच्या मते, जगभरातील १००
वर्षे जगणाऱ्या प्रमुख ठिकाणांवरील लोकांनी या चार नियमांचे पालन केले पाहिजे.
चांगल्या आहाराशी संबंधित
या चार सवयी तुम्हाला ठेवतील निरोगी दररोज १५० ग्रॅम डाळ, बीन्सचे सेवन करा पीएलओएस मेडिसिनमधील संशोधन सांगते की,
ज्या लोकांच्या आहारात बीन्स, कडधान्ये आणि शेंगा यांसारख्या गोष्टींचा
समावेश असतो त्यांचे आयुर्मान जास्त असते. त्यांच्या सेवनाने कोलेस्टेरॉल आणि
रक्तातील साखर नियंत्रित राहते. हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, मधुमेहाचा धोकाही
कमी असतो. ते दररोज सुमारे १५० ग्रॅम सेवन केले पाहिजे.
दररोज मूठभर सुकामेवा
खावा सुक्यामेव्यात मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजे आढळतात. जामा इंटरनॅशनलच्या संशोधनानुसार,
जे लोक आठवड्यातून किमान ४ दिवस मूठभर सुकामेवा
खातात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ५१ टक्के कमी असतो आणि हृदय व
रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे मृत्यूचा धोका ४८ टक्के कमी असतो.
दिवसभरातील बहुतांश जेवण
दुपारपर्यंत घ्यावे दिवसभरातील जेवण दुपारी वा दिवस संपेपर्यंत घेतले तर रक्तातील
साखर, कोलेस्टेरॉल व चयापचयातील
जोखीम घटक अधिक चांगले असतात. विली ऑनलाइन लायब्ररीच्या संशोधनानुसार, ते अधिक चरबी बर्न करते. लठ्ठपणाचा धोका कमी
होतो.
कुटुंबासोबत जेवण अवश्य
करा २४ तासांत कुटुंबासमवेत एक वेळ जेवण करण्याचा प्रयत्न करा. संशोधनात आढळले की,
जी कुटुंबे एकत्र जेवण करतात त्यांच्या
मुलांमध्ये ईटिंग डिसआॅर्डर होण्याची शक्यता कमी असते. अशा कुटुंबांतील मुलांमध्ये
लठ्ठपणाचा धोका खूप कमी असतो.
टिप्पणी पोस्ट करा