Health: ब्रेन हॅमरेजचा धोका कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा; रिसर्चमध्ये दावा



ब्युरो टीम: व्यायाम किंवा वर्कआउट केल्याने आपले शरीर तंदुरुस्त राहते. यामुळे आपल्या शरीराचा स्टॅमिना वाढतो, ज्यामुळे आपले शरीर दीर्घकाळ काम करण्यास सक्षम होते.

मात्र, गोथेनबर्ग विद्यापीठाच्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, नियमित शारीरिक हालचालींमुळे ब्रेन हॅमरेजचा धोका कमी होतो. संशोधकांनी मेंदूचे संरक्षण करण्यासाठी शारीरिक हालचालींच्या महत्त्वावर भर दिला आहे. स्ट्रोक अँड व्हॅस्कुलर न्यूरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, 2014 ते 2019 या कालावधीत इंट्रासेरेब्रल रक्तस्रावाच्या उपचारासाठी गोथेनबर्ग विद्यापीठात गेलेल्या 686 लोकांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले.

या संशोधनानुसार, जे लोक नियमितपणे शारीरिकरित्या अॅक्टिव्ह होते, त्यांच्यामध्ये हॅमरेज होण्याचा धोका कमी असल्याचे दिसून आले. शारीरिकरित्या अॅक्टिव्ह असण्यामध्ये चालणे, सायकल चालवणे, पोहणे, बागकाम किंवा नृत्य यासारख्या शारीरिक हालचालींचा समावेश होतो. संशोधनानुसार, अशी हलकी शारीरिक कामे आठवड्यातून सुमारे 4 तास करणे आवश्यक आहे.

संशोधकांच्या मते, नियमित शारीरिक हालचाली करणाऱ्या लोकांमध्ये रुग्णालयात पोहोचण्याच्या वेळी रक्तस्त्राव होण्याचे प्रमाण 50 टक्के कमी होते. प्राण्यांच्या अभ्यासातही असाच संबंध यापूर्वी दिसला आहे, परंतु त्यापूर्वी कोणताही अभ्यास समोर आला नव्हता, ज्यामध्ये मानवांबद्दल याबाबत सांगितले गेले होते. तसेच, इंट्रासेरेब्रल रक्तस्राव असलेल्या लोकांवर रुग्णालयात सीटी स्कॅनद्वारे उपचार केले जातात आणि रक्तस्त्रावाच्या तीव्रतेनुसार न्यूरोसर्जरीची आवश्यकता असू शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे.

दरम्यान, बहुतेक प्रकरणांमध्ये नॉन-सर्जिकल पद्धती आणि औषधे रिकव्हरीला प्रोत्साहन देण्यासाठी वापरली जातात. इंट्रासेरेब्रल रक्तस्त्राव हा स्ट्रोकचा सर्वात धोकादायक प्रकार आहे आणि मृत्यूची भीती आहे. गोथेनबर्ग विद्यापीठातील न्यूरोसर्जरीचे संशोधक आणि सहयोगी प्राध्यापक अॅडम व्हिक्टोरिसन यांनी सांगितले की इंट्रासेरेब्रल रक्तस्त्राव झाल्यास कवटीवर दबाव वाढण्याचा धोका असतो, ज्यामुळे संभाव्य घातक परिणाम होऊ शकतात.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने