HSC Result Today: आज बारावी निकाल; १४ लाख विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला; 'या' वेबसाईटवर पहा ...



ब्युरो टीम:  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२५) दुपारी दाेन वाजल्यापासून ऑनलाइन जाहीर होईल.

मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल, अशी माहिती मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व काेकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षा घेण्यात आल्या हाेत्या. राज्यातील ३ हजार १९५ परीक्षा केंद्रांवर सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती.

पुनर्मूल्यांकनासाठी छायाप्रत अनिवार्य

उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यानंतर पाच दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

पुनर्परीक्षेसाठी २९ जूनपासून अर्ज

जुलै-ऑगस्टमध्ये हाेणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षा देणारे विद्यार्थी आणि श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी २९ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत.

कधी?

दुपारी २ वाजल्यापासून

 

कुठे पाहाल निकाल?

mahresult.nic.in

hse.mahresults.org.in

hscresult.mkcl.org

विद्यार्थ्यांना विषय निहाय गुण अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील आणि त्याची प्रिंटही घेता येईल. कनिष्ठ महाविद्यालयांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध करून देण्यात येईल.

गुण पडताळणी करायची असेल तर..?

विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांतील गुणांची पडताळणी करता येणार आहे. उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने (verification.mhehsc.ac.in) या संकेतस्थळावरून स्वत: तसेच कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येईल.

यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना बारावीची गुणपत्रिका व स्थलांतर प्रमाणपत्र त्यांच्या शाळा, महाविद्यालयामार्फत ५ जूनपासून दुपारी ३ नंतर वितरित करण्यात येतील.

गुणपडताळणीसाठी २६ मे ते ५ जून व छायांकित प्रतीसाठी २६ ते १४ जून या वेळेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासोबतच ऑनलाइन पद्धतीने डेबिट, क्रेडिट आणि यूपीआय आणि बँकिंगद्वारे शुल्क भरता येणार आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने