ब्युरो टीम: चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स(CSK
vs GT) यांच्यात इंडियन प्रिमिअर
लीग २०२३ चा फायनल सामना रंगणार आहे.
रविवारी होणारी ही मॅच
पावसामुळे रद्द झाली. पाऊस इतका होता ज्यामुळे टॉसदेखील झाला नाही. त्यामुळे
सोमवारी राखीव दिवशी हा सामना खेळवला जाणार आहे. परंतु आजदेखील पावसाचा अंदाज
वर्तवला जात आहे. अशा परिस्थितीत IPL चॅम्पियन कसा ठरवला जाईल याबाबत जाणून घेऊया.
किती वाजता ओव्हर कमी
केल्या जातील?
जर आजही पाऊस झाला आणि
मॅच कुठल्याही स्थितीत रात्री ९.३५ पर्यंत सुरू झाली तर ओव्हर कमी केल्या जाणार
नाहीत. या सामन्यात पूर्ण २० ओव्हर टाकल्या जातील. परंतु या वेळेनंतर सामना खेळवला
तर काही ओव्हर कमी केल्या जाऊ शकतात.
मॅचचे कट ऑफ टाइम काय
असेल?
रात्री ९.३५ नंतर मॅच
सुरू झाली तर ओव्हर कमी केल्या जातील. सामना सुरू होण्यास जितका विलंब लागेल
तितक्या ओव्हर कमी होत जातील. सामना सुरू करण्याची शेवटची वेळ रात्री १२.०६ मिनिटे
राहील. जर यावेळेपर्यंत मॅच सुरू झाली तर सामना केवळ ५-५ ओव्हरचा खेळवला जाईल.
५-५ ओव्हरही झाल्या नाहीत
तर...
पावसामुळे सामना
खेळवण्यास विलंब झाला तर अशा परिस्थितीत सुपर ओव्हर होऊ शकते. नियम सांगतो की,
फायनलसाठी राखीव दिवशी अतिरिक्त वेळेपर्यंत ५
ओव्हरची मॅच करणेही संभव झाले नाही तर सुपर ओव्हर होऊ शकते. जर परिस्थिती शक्य
झाली तर या सामन्याने विजेता ठरवला जाऊ शकतो.
सुपर ओव्हरही खेळणे शक्य
नसले तर...
जर आजच्या सामन्यात
पावसामुळे सुपर ओव्हरही खेळणे शक्य झाले नाही तर गुजरात टायटन्स टीम सलग
दुसऱ्यांदा आयपीएल खिताब जिंकेल. नियम सांगतो की, जर पाऊस अथवा अन्य कारणाने सामना खेळला नाही तर ७०
सामन्यांच्या लीग राऊंडमध्ये जी टीम सर्वोच्च स्थानी आहे ती विजेता बनण्याचा
प्रमुख दावेदार असते. IPL २०२३ च्या १४
मॅचमध्ये १० मॅच जिंकून गुजरात टायटन्सही पाँईट टेबलवर टॉपवर आहे. तर चेन्नईकडे १७
पाँईट आहेत.
अहमदाबादमधील हवामानाचे
अपडेट
चेन्नई सुपर किंग्स आणि
गुजरात टायटन्स यांच्यात आज राखीव दिवशी सामना खेळला जाईल असं सांगितले जात आहे.
अहमदाबादमध्ये सोमवारी ढगाळ वातावरण राहील परंतु संध्याकाळपर्यंत ते दूर होईल असा
अंदाज वर्तवला जातोय. मॅचवेळी पावसाची १० टक्के शक्यता आहे. आर्द्रता ४५-४० टक्के
दरम्यान राहू शकते. वाऱ्याचा वेग ११ किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा