Ipl: Mi vs srh : मुबंईने साकराला मोठा विजय, कॅमरून ग्रीन चे पहिले शतक

 

ब्युरो टीम :मस्ट वीन मॅचमध्ये मुंबईच्या फलंदाजांनी आज जबरदस्त कामगिरी केली. लखनऊ विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी विलन ठरलेला कॅमरुन ग्रीन आज हिरो ठरला. त्याने तुफान बॅटिंग केली.


प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादवर 8 विकेट राखून शानदार विजय मिळवला. कॅमरुन ग्रीनची सेंच्युरी हे मुंबईच्या विजयाच वैशिष्टय ठरलं. त्याने 47 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. यात 8 फोर आणि 8 सिक्स आहेत. या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईचे 16 पॉइंट्स झाले आहेत. मुंबईच्या चाहत्यांच लक्ष आता रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि गुजरात टायटन्सच्या मॅचवर असणार आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा पराभव झाल्यास मुंबईचा प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित होईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने