Jayantpatil: जयंत पाटलांची ईडीकडून चाैकशी; कार्यकर्ते आक्रमक,राष्ट्रवादीकडून जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध



 ब्युरो टीम: विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून ईडी, सीबीआय अशा केंद्रीय यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरू आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. राष्ट्रवादीकडून जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध व्यक्त करण्यात आला.

 मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, अंबादास गारुडकर, अशोक बाबर, किसनराव लोटके, बाबासाहेब तरटे, रोहिदास कर्डिले आदी उपस्थित हाेते. निवेदनात म्हटले आहे की, ईडी, सीबीआय अशा केंद्रीय यंत्रणाचा सत्ताधाऱ्यांकडून दुरुपयोग करून विरोधीपक्षाची मुस्कटदाबी करण्याचा डाव सुरू आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींपेक्षा जास्त मोठा भ्रष्टाचाराचा खटला ठेवला गेला. त्यांना १३ महिने तुरुंगात ठेवण्यात आले. मात्र, चौकशीत हे सत्य नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच माजी मंत्री नवाब मलिक, एकनाथ खडसे यांचे जावई, माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मागेही चौकशी लावण्यात आली. आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची चाैकशी सुरू आहे. विरोधकांना संपवण्याचे कारस्थान सुरू आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने