Karnataka Election Result 2023 : एचडी कुमारस्वामींना मोठा धक्का: माजी पंतप्रधानांचे नातू निखील कुमारस्वामी यांचा पराभव



ब्युरो टीम: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल कुमारस्वामी याला पराभवाचा धक्का बसला. निवडणुकीच्या रिंगणात तो वडील एचडी कुमारस्वामी यांच्या पारंपरिक मतदारसंघात उतरला होता.

एचडी कुमारस्वामी २००४ पासून सतत निवडणूक जिंकलेल्या या मतदारसंघात त्यांच्याच मुलाला पराभूत व्हावं लागलं. काँग्रेसचे उमेदवार हुसैन एच ए यांनी निखिल कुमारस्वामीचा पराभव केला. रामनगर विधानसभा मतदार संघ हा जेडीएसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. निखिल कुमारस्वामी पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.

 

कन्नड चित्रपटसृष्टीत अभिनयात कारकिर्द गाजवलेल्या निखिल यांचा चेहरा ओळखीचा आहे. मात्र तरीही त्यांना पराभवाचा धक्का बसला. 2018 मध्ये या मतदारसंघात एचडी कुमारस्वामी विजय मिळवत चौथ्यांदा आमदार बनले होते. याच मतदारसंघात 1994 मध्ये माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी विजय मिळवला होता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने