Karnatakaelection:कर्नाटकात मतांच्या फरकाने टेन्शन वाढविले; कोणत्याही क्षणी निकाल फिरण्याची शक्यता?



ब्युरो टीम: कर्नाटकात सुरुवातीच्या निकालांमध्ये काँग्रेस सत्तेच्या जवळ जात असल्याचे दिसत आहे.परंतू, कोणत्याही क्षणी हा निकाल बदलण्याची शक्यता आहे. जवळपास १२७ जागा अशा आहेत, ज्या ठिकाणी कधीही उलथापालथ होण्याची शक्यता आहे. अद्याप कोणत्याच जागांवर निकाल जाहीर झालेले नाहीएत.

कर्नाटकात सध्याच्या कलानुसार काँग्रेस ११९, भाजपा ७२ आणि जेडीएस २४ अशा जागांवर आघाडीवर दिसत आहे. परंतू यापैकी १२७ जागा अशा आहेत, जिथे पहिल्या दोन उमेदवारांमधील मतांचा फरक हा फार कमी आहे. जरा जरी इकडे तिकडे झाले तरी यापैकी २९ जागा हातच्या जाण्याची शक्यता आहे.

कर्नाटकातील २९ जागांवर १००० पेक्षा कमी मताधिक्याचा फरक आहे. तर ९८ जागांवर ५००० पेक्षा कमी मताधिक्याचा फरक आहे. अद्याप मतमोजणीच्या काही फेऱ्या व्हायच्या आहेत. यामध्ये भाजपा, काँग्रेस आणि जेडीएसच्या उमेदवारांचा समावेश आहे. यामुळे पुढील फेऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला जास्त मते मिळाली तर हा कल फिरण्याची शक्यता दिसत आहे.

काँग्रेसने हालचाली करण्यास सुरुवात केली असून जे उमेदवार आघाडीवर आहेत ते विजयी झाल्यास त्यांना लागलीच बंगळुरुला आणण्याची तयारी सुरु केली आहे. या आमदारांना गेल्यावेळेप्रमाणेच हॉटेलवर ठेवण्यात येणार आहे. यासाठी हैदराबादमध्ये रिसॉर्ट बुक केल्याची माहिती आहे. य़ा रणनितीसाठी काँग्रेसने विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. यामध्ये गरज लागलीच तर जेडीएसशी हातमिळवणी करण्याची ही चर्चा करण्यात येणार आहे.

 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने