Loksabha ; लोकसभेसाठी शिंदे- भाजपचा प्लन ठरला; २२-२२ जागा लढणार



ब्युरो टीम:  कर्नाटक निवडणूक झाल्यानंतर देशातील राजकीय नेत्यांचे आणि जाणकारांचे लोकसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत कोणता पक्ष काय डावपेच आखणार यावर आता चर्चा सर्वत्र घडू लागली आहे. अशात भाजपसोबत असलेल्या शिंदे गटाकडून लोकसभेच्या जागांविषयी मोठे विधान करण्यात आले आहे. शिंदे गट आगामी लोकसभेच्या निवडणुकीत 22 जागांवर उमेदवार देणार असल्याचे विधान खासदार राहुल शेवाळे यांनी केले आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या जागा फॉर्म्युलाच्या चर्चेनंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या जागा वाटपाची चर्चा जोर धरू लागली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने