Mahavikasaghadi: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला काय? काँग्रेसचा गजा वाटपाचा प्रस्ताव



ब्युरो टीम: विरोधक कायमच महाविकास आघाडीत एकवाक्यता नसल्याची टीका करतात. शिवाय तिन्ही पक्षांना समान वागणूक मिळत नसल्याचं बोललं जातं. या सगळ्या टीकेला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने एक प्रस्ताव पुढे केला आहे.

काँग्रेसचा प्रस्ताव

लोकसभेसाठी समसमान जागा लढवण्याबाबत‌ महाविकास आघाडीत चर्चा झाली आहे. 16-16-16 जागांच्या फॉर्मुल्याबाबत काँग्रेस आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. जागावाटप समान झाल्यास एकत्र असल्याचा संदेश जाईल अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे, अशी माहिती आहे.

महाविकास आघाडी म्हणून 2024 ची निवडणूक एकत्र लढायची असल्यास समसमान जागा वाटप व्हायला पाहिजे. यामुळे जनतेत एकता आणि समानतेचा संदेश जाईल. शिवाय तिन्ही पक्ष एकत्र लढल्याने जास्तीत जास्त जागा निवडून येतील, अशी काँग्रेसची भूमिका आहे.

आता जरी काँग्रेसचा एकच खासदार असला तरी भविष्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असेल. त्यासाठी समसमान जागा वाटप झाल्यास ते महाविकास आघाडीसाठी फायदेशीर राहील, असं काँग्रेसचं म्हणणं आहे.

या प्राथमिक फॉर्म्युलासह एक दोन जागांचा कोटा कमी करण्याबाबत महाविकास आघाडीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने