Mahavikasaghadi: उद्धव ठाकरेंचा महाविकास आघाडीला धक्का; बैठकितली चर्चा बाहेर ;लोकसभेच्या एवढ्या जागेवर केला दावा

 


 ब्युरो टीम: उदय जाधव, प्रतिनिधीमुंबई, 16 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं भाजपचा दारूण पराभव केल्यानंतर देशभरातल्या विरोधी पक्षांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

कर्नाटकच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी राज्यात महाविकासआघाडीची बैठक शरद पवारांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला शरद पवारांसह उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडीचे मुख्य नेते उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा झाली, पण यावरून महाविकासआघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातून शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले होते, त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना 20 जागांवर लढवण्यावर ठाम असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

'मविआच्या बैठकीत मी आंधळा, बहिरा, मुका', असं का म्हणाले जितेंद्र आव्हाड?

शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या महाविकासआघाडीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या 48 जागांच्या वाटपाबाबत चर्चा झाली, अशी माहिती महाविकासआघाडीच्या नेत्यांनी दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही नेते लोकसभा निवडणुकीत तीनही पक्ष समसमान म्हणजेच प्रत्येकी 16 जागांवर लढतील, अशी चर्चा झाल्याची माहिती पसरवत आहेत. पण न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 निवडून आलेल्या 18 जागा आणि 2 अतिरिक्त जागांवर शिवसेनेचे सर्वोच्च नेते ठाम असल्याचं सांगण्यात आलंय. रविवारी झालेल्या महाविकासआघाडीच्या बैठकीमध्ये स्वत: उद्धव ठाकरे यांनी समसमान जागांच्या चर्चेला विरोध केला होता, त्यामुळे सध्या महाविकासआघाडीमध्ये लोकसभेच्या समसमान जागांच्या चर्चेला सुरूंग लागला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने