Ms DHONI: मी चेन्नईसाठी कायम उपलब्ध असेन; निवृत्तीचा प्रश्न विचारताच M S DHONI ने स्पष्टचं सांगितलं



ब्युरो टीम: IPL 2023 मध्ये, मंगळवारी महेंद्रसिंग धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जने पहिल्या क्वालिफायरमध्ये हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना चार वेळच्या चॅम्पियन सीएसकेने 20 षटकांत सात गडी गमावून 172 धावा केल्या.

प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 20 षटकांत 157 धावांवर गारद झाला. सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये समालोचक हर्षा भोगले यांनीही धोनीला त्याच्या निवृत्तीबद्दल प्रश्न विचारले. यावर धोनीने सांगितले की, त्याच्याकडे निर्णय घेण्यासाठी आठ-नऊ महिने शिल्लक आहेत. अशा स्थितीत त्याला घाईघाईने निर्णय घ्यायचा नाही.

नेमकं काय म्हणाला धोनी

सामना संपल्यानंतर धोनी म्हणाला – आयपीएल ही इतकी मोठी स्पर्धा आहे की तुम्ही आणखी एक फायनल राहिली आहे असं म्हणू शकत नाही. पूर्वी आठ संघ असायचे, आता दहा संघ खेळतात. मी असे म्हणणार नाही की ही आणखी एक फायनल आहे. आमच्या मेहनतीला दोन महिने लागले. सर्वांनी योगदान दिले आहे. होय, मधल्या फळीला पुरेशा संधी मिळालेल्या नाहीत. गुजरात एक उत्कृष्ट संघ आहे.

पुढील वर्षी खेळणार या प्रश्नावर धोनीचे उत्तर

धोनी पुढील वर्षी खेळणार का असा सवाल विचारलं असता तो म्हणाला,”माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी आठ ते नऊ महिने आहेत, कारण पुढील लिलाव एकतर या वर्षी डिसेंबरमध्ये किंवा पुढील वर्षी जानेवारीमध्ये आहे. अशा स्थितीत आतापासूनच त्याची डोकेदुखी का घ्यावी. मी खेळू किंवा न खेळू मी नेहमीच सीएसकेसाठी असेन. खेळाडू म्हणून राहील किंवा बाहेरून खेळाडूला मदत करत राहील.

क्वालिफायर-2 26 मे रोजी होणार आहे

चेन्नईला आता २८ मे रोजी होणाऱ्या फायनलसाठी खेळायचे आहे. त्याचबरोबर गुजरातला आता २६ मे रोजी होणारा क्वालिफायर-२ खेळावा लागणार आहे. गुजरातचा सामना बुधवारी लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील एलिमिनेटर सामन्यातील विजेत्या संघाशी होईल. लखनौ आणि मुंबईतील विजेते क्वालिफायर-2 खेळतील, तर पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. क्वालिफायर-II चा विजेता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर जाईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने