Narendra modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पहिले ट्विट; जनतेला दिले आश्वासन; तिसऱ्या टर्मसाठी मोठी तयारी सुरु



ब्युरो टीम: नऊ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले होते. आज याला ९ वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे भाजपाने मोदींच्या तिसऱ्या टर्मसाठी मोठी तयारी सुरु केली आहे.

गावागावात मोदी सरकारच्या या काळातील योजनांची माहिती दिली जाणार आहे. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वी पहिले ट्विट करत जनतेला आश्वासन दिले आहे.

आज आपण राष्ट्रसेवेला ९ वर्षे पूर्ण करत असताना, मी नम्रतेने आणि कृतज्ञतेने ओतप्रोत आहे. घेतलेला प्रत्येक निर्णय, केलेली प्रत्येक कृती, लोकांचे जीवन सुधारण्याच्या इच्छेने प्रेरीत आहे. विकसित भारताच्या उभारणीसाठी आम्ही आणखी कठोर परिश्रम करत राहू, असे आश्वासन मोदी यांनी दिले आहे.

तसेच आमच्या विकासाच्या प्रवासाची झलक पाहण्यासाठी मी सर्वांना https://nm-4.com/9yrsofseva या वेबसाईटवर निमंत्रित करत असल्याचेही मोदी म्हणाले. विविध सरकारी योजनांचा लोकांना कसा फायदा झाला, हे यामध्ये पाहता येणार आहे.

 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने