Narendramodi: बॉलीवूडमधल्या चित्रपटांमध्ये काम केलं तर सगळे फिल्मफेअर त्यांनाच मिळतील; केरळा स्टोरीवरुन ओवैसींची बोचरी टीका



ब्युरो टीम:  'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात चार महिलांचे मुस्लिम धर्मात परिवर्तन करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते, असे दाखवण्यात आले आहे.

यावरून अनेकांनी या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. मात्र एकीकडे या चित्रपटाला काही जण विरोध करत आहेत. तर दुसरीकडे या चित्रपटाला काही प्रेक्षकांचा आणि राजकीय नेत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचे समर्थन केल्याचं दिसून आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकच्या प्रचार दौऱ्यावर असताना. त्यांनी जनसभेला संबोधित करताना द केरळ स्टोरी हा चित्रपट दहशतवादाच्या कटकारस्थानावर आधारित आहे.

दहशतवादाचं विक्षिप्त सत्य समोर आणण्याचं काम चित्रपट करतोय. दशवाद्यांचं डिझाईन सर्वांसमोर मांडतोय. काँग्रेस दहशतवादावर आधारित या चित्रपटाला विरोध करत आहे, आणि दहशतवादी प्रवृत्तीसोबत उभी आहे. काँग्रसने वोट बँकेसाठी दहशवादाला थारा दिलाय, असे मोदींनी म्हटले होते.

दरम्यान, मोदींच्या या विधानासंदर्भात आता असदुद्दीन औवेसींनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. “आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे अभिनेते आहेत, ते बॉलिवूडमध्ये असते तर सर्व अभिनेते फिके पडले असते’. असे म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी मोदींवर बोचरी टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातले सर्वात मोठे कलाकार आहेत.

बॉलीवूडमधल्या चित्रपटांमध्ये काम केलं तर सगळे फिल्मफेअर त्यांनाच मिळतील. 'केरळ स्टोरी'सारख्या चित्रपटाचं ते प्रमोशन करतात. ही मुस्लिम द्वेष करण्याची वाईट पद्धत आहे. हिटलरने सुद्धा 70 लाख ज्यू लोकांना मारलं होतं. इथे पण नरेंद्र मोदी तोच हिंदुत्वाचा अजेंडा राबवात आहेत, असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने