Narendramodi: जपानमधील हिरोशिमा येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले अनावरण



ब्युरो टीम: G7 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून जपानमध्ये असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हिरोशिमा येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले. अनावरणानंतर त्यांनी महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण केली.

अनावरणानंतर पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजही ‘हिरोशिमा’ हा शब्द ऐकून जग घाबरते. जी 7 शिखर परिषदेसाठी माझ्या जपान भेटीदरम्यान मला महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळाली. हिरोशिमा येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यामुळे अहिंसेचा विचार पुढे जाईल.”

पीएम मोदी म्हणाले, “मी जपानच्या पंतप्रधानांना भेट दिलेला बोधी वृक्ष इथे हिरोशिमामध्ये लावण्यात आला आहे. माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, जेणेकरून लोकांना येथे आल्यावर शांततेचे महत्त्व समजेल. मी महात्मा गांधींचा आदर करतो.”

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने