Nato: अमेरिकेला भारताची गरज , भारताला नाटो प्लसचा दर्जा देण्याची शक्यता, अमेरिकी काँग्रेसच्या सिलेक्ट कमिटीची शिफारस



ब्युरो टीम;  तैवानवर कब्जा मिळविण्यासाठी कारवाया करणाऱ्या चीनला वेसण घालण्यासाठी अमेरिकेला भारताचे सहकार्य आवश्यक वाटत आहे.

त्या पार्श्वभूमीवर भारताला नाटो प्लस हा दर्जा देण्याची शिफारस अमेरिकी काँग्रेसच्या सिलेक्ट कमिटीने केली आहे.

नाटो प्लस या श्रेणीत पाच देशांचा समावेश आहे. कमिटीची शिफारस मंजूर झाली तर भारत त्या श्रेणीतील सहावा सदस्य बनणार आहे. अमेरिकी काँग्रेसच्या सिलेक्ट कमिटीने म्हटले आहे की, भावी काळात जर चीनने तैवानवर हल्ला केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी क्वाड गटाच्या देशांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे. क्वाड गटात भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान या चार देशांचा समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने