NCP: शरद पवार तहयात अध्यक्ष? नकार दिल्यास निवड समितीने राष्ट्रवादी समोर दिले दोन पर्याय



ब्युरो टीम:  शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी 15 सदस्यीय समितीची बैठक होत आहे. समिती जो निर्णय घेईल तो त्यांना मान्य असेल असे पवार यांनी म्हटले आहे. शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला आहे. शरद पवारच राहणार अध्यक्ष. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतला मोठा निर्णय.

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू. प्रफुल्ल पटेल यांनी दोन प्रस्ताव मांडले. त्यातला पहिला प्रस्ताव शरद पवार यांनी अध्यक्षपदी कायम रहावेत. तर दुसरा प्रस्ताव शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर केल्याचा आहे. शरद पवारांनी अध्यक्षपदी कायम राहावे, पहिला पर्याय आहे. त्यांनी नकार दिल्यास सुप्रिया सुळे अध्यक्ष असतील. शिवाय शरद पवारांकडे तहहयात अध्यक्षपद सोपवण्याची शक्यता आहे. शरद पवारांनी अध्यक्षपद स्वीकारलेच नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पर्याय तयार असल्याचे समजते. विरोधीपक्ष नेते अजित पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले आहेत.

 राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी याठिकाणी सुरू आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, अनिल देशमुख बैठकीसाठी पोहोचले आहेत.

खासदार सुप्रिया सुळे देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पोहोचल्या आहेत. जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी पहिल्या क्षणापासून बोलत आहे की ज्या अपत्याला शरद पवारांनी जन्म घातला आहे त्याला ते आता वाऱ्यावर सोडू शकत नाही.धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील बैठकीला पोहोचले आहेत.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विविध जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देऊन ते प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्याकडे पाठवले आहेत. प्रदेशाध्यक्षांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. शरद पवार यांच्या निर्णयानंतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना तीव्र धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरून दोन दिवस सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींना आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. नवीन नेतृत्वाच्या निवडीसाठी पवारांनी नेमलेल्या समितीची शुक्रवारी सकाळी मुंबईत बैठक होत आहे.

बैठकीत ‘शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन तहहयात पक्षाध्यक्ष राहावे,’ असा एक ओळीचा ठराव ठेवला जाण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह व समितीच्या ठरावाचा मान राखून पवार निवृत्तीचा निर्णय मागे घेतील, अशी शक्यता आहे.

 शरद पवारांनी राजीनामा दिल्याने राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन दोघेही खूश नाहीत. दोघांनीही शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना फोन करून वडिलांना राजीनामा मागे घेण्याबाबत गुरुवारी सांगितले आहे. पवारांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा. अशी विनंती राहुल गांधी यांनी केलेली आहे.

 नेतृत्व निवडण्यासाठी 20 जणांची समिती पवारांनी ठरवली आहे. त्यात अजितदादा व धनंजय मुंडे सोडले तर सर्व जण पवारांचाच शब्द प्रमाण मानणारे आहेत. एकनाथ खडसे यांचा समितीत समावेश नव्हता. मात्र गुरुवारी अचानक त्यांचे नाव पवारांनी समाविष्ट केले

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने