Pak vs ind : पाकिस्थानातच काय जगात कोठेही पाकिस्थान सोबत द्विपक्षीय मालिका खेळणार नाही बीसीसीआयची पाकला केराची टोपली



ब्युरो टीम: भारत व पाकिस्तान यांच्यात तटस्थ ठिकाणी द्विपक्षीय मालिका खेळवण्याचा प्रस्ताव पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी दिला होता. हा प्रस्ताव बीसीसीआयने फेटाळून लावला आहे.

आयसीसीच्या व आशिया समितीच्या स्पर्धा वगळला पाकिस्तानविरुद्ध पाकिस्तानातच नव्हे तर जगात अन्यत्र कुठेही अशी मालिका भारतीय संघ खेळणार नाही, असे मत व्यक्त करत बीसीसीआयने या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळण्याची योजना नाही. भविष्यात किंवा आगामी काळात अशी कोणतीही मालिका खेळवण्याची योजना नाही. आम्ही पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारची द्विपक्षीय मालिका खेळण्यास तयार नाही, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सेठी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिकेला ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यास मान्यता देत तसा प्रस्ताव भारत व ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाला पाठवला होता. मात्र अशी कोणतीही माहिती नसून असा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही.

तसेच पुढील काळात असा प्रस्ताव आला तरीही त्याचा विचार केला जाणार नाही. कारण भारत व पाकिस्तान यांच्यात अशी कोणतीही मालिका व्हावी किंवा नाही याचा निर्णय बीसीसीआय नव्हे तर 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने