Police : सायबर गुन्हेगारीला आपणच जबाबदार :काळजी घेणे गरजेचे - आमोद वाघ

 

ब्युरो टीम : सायबर क्राईम रोखण्यासाठी आपणच जबाबदार आहोत. आजूबाजूला अनेक गुन्हे घडत असतानाही त्यातून बोध न घेता निष्काळजीपणामुळे लाखो रूपयांचे नुकसान होऊन पश्चाताप करण्याची वेळ येवु नये, यासाठी सायबर क्राईमबद्दल जनजागृती महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन आमोद वाघ यांनी केले.

ब्राह्मण बिझिनेस नेटवर्क वेलफेअर असोसिएशन रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रीटी आणि पेमराज सारडा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सायबर सिक्युरिटी आणि आपण’ या विषयावर घेण्यात आलेल्या सेमिनारमध्ये श्री वाघ बोलत होते.‌ ते पुढे म्हणाले की , भारताचा सायबर क्राईम मध्ये पहिला क्रमांक असून, सुमारे ८४ हजार कोटी इतकी रक्कम सायबर गुन्हा्व्दारे गोळा केली गेली आहे.‌यातील फक्त ७८०० कोटी रक्कम परत मिळाली आहे.. या रक्कम मोठ्या प्रमाणात अतिरेकी कारवायांकरिता वापरला जातो. अनेकदा आमिष, लालूच, अधिक पैशाची हाव‌ , लवकरात लवकर पैसे मिळविणे, भय, भीती , निष्काळजीपणा अशा विविध माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे आपण सायबर गुन्हेगारांना बळी पडतो. आपल्या मोबाईलवर असणाऱ्या विविध अॅपच्या माध्यमातून माहिती गोळा केली जाऊन येणाऱ्या प्रत्येक मेसेज , कॉन्टॅक्ट पर्यंत लक्ष ठेवले जाते. त्यामुळे अॅपला परमिशन देताना विचार करावा. समाजमाध्यमांवर फोटो टाकताना खूप दक्षता घ्यायला हवी.‌ आपल्या जवळच्या व्यक्तींचे फोटो शक्यतो सार्वजनिक करू नका,असा सल्ला त्यांनी दिला. ईमेल, बॅंकिंग पासवर्ड शक्यतो १२-१६ अंकी असावा जेणेकरून तो सहजासहजी क्रॅक करता येत नाही. असे पासवर्ड क्रॅक करायला १० वर्षे लागतात.

या व्याख्यानासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रण‌शेवरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, गुगल पे, फोन पे चे ओटीपी कधीही कुणाला देऊ नयेत. योग्य दक्षता घेतली तर गुन्ह्याचे प्रमाण कमी होऊन आर्थिक नुकसान टाळू शकतात. सायबर गुन्हा घडल्यापासून १ तासाच्या आत १९३० या क्रमांकावर तक्रार नोंदवावी.

हिंदसेवामंडळाचे अध्यक्ष प्रा मोडक सर , कार्याध्यक्ष अॅड अनंत फडणीस , प्राचार्या डॉ माहेश्वरी गावित , बॅंक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी सागर नाईक, अभिजीत फळे, रवी डिक्रुज, पोलीस नाईक अभिजीत अरकल , राहुल गुंडू विनीत मुंगी उपस्थित होते.

  प्रास्ताविक हेमंत लोहगावकर यांनी केले. सूत्रसंचालन अमित काळे यांनी केले तर आभारप्रदर्शन निखिल कुलकर्णी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्नेहल धर्माधिकारी यांनी परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने