pune bypol election:पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची निवडणूक; प्रशासनाकडून तयारी सुरु



ब्युरो टीम:, पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आयोगाने जाहीर केली नसली, तरी जिल्हा प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाकडे नवीन बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट अशा 12,600 मशीन जिल्हा प्रशासनाकडे आल्या आहेत. आयोगाने पोटनिवडणुक जाहीर केली, तर सज्जता असावी या हेतूने प्रशासनाने तयारी सुरू केल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

गिरीश बापट यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे. दरम्यान, एप्रिल 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. त्यामुळे काही महिन्यांसाठी ही पोटनिवडणूक होणार की नाही, याबाबत चर्चा सुरू आहेत. दरम्यान, प्राप्त साहित्यांत बॅलेट युनिट 4,200, कंट्रोल युनिट 4,200 आणि व्हीव्हीपॅट 4,200 मशीनचा समावेश आहे. कोरेगाव पार्क धान्य गोदामात या यंत्रांची प्राथमिक तपासणी दोन दिवसांत पूर्ण होईल, असा अंदाज आहे.

मशीन वापरण्यायोग्य आहे का, मशीनची फर्स्ट लेव्हल आदी बाबींची उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या देखरेखीखाली तपासणी सुरू आहे.

मतदारसंघ दृष्टीक्षेपात..

पुणे लोकसभा मतदारसंघात वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तर, 19 लाख 72 हजार इतकी मतदारसंख्या आणि सुमारे दोन हजार मतदानकेंद्र आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने