pune university: वसतिगृह विद्यार्थ्यांच्या अडचणी संबंधित प्रश्न विचारले म्हणून w app group मधून विद्यार्थी प्रतिनिधीस काढून टाकले



 ब्युरो टीम:  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह कार्यालयाकडून Dept Hostel Co-ordinator या नावाचा एक w app,group तयार करण्यात आला होता . यामध्ये वसतिगृहप्रमुखासह विद्यापीठातील सर्व विभागातील प्रत्येकी एका प्राध्यापकाचा समावेश करण्यात आला होता . यासोबतच विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू प्रा. डॉ . संजीव सोनवणे सर यांच्या शिफारशीनुसार पीएच . डी . संशोधक व विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून राहुल ससाणे  व तुकाराम शिंदे यांची निवड करून दोघांनाही त्या संबंधित group मध्ये समाविष्ट करण्यास सांगितले होते . त्यानुसार आम्ही दोघे त्या group मध्ये होतो. विद्यापीठातील विद्यार्थी - विद्यार्थ्यांनीच्या वसतिगृहा संबंधित जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आम्ही या group मध्ये मांडण्याचे काम करत होतो. गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे असेल अथवा वसतिगृहातील पाणी प्रश्न , स्वच्छता , लिफ्ट सुविधा इ. बाबींवर आम्ही प्रश्न विचारात होतो. थोडक्यात  वसतिगृह कार्यालयातील गैरकारभारावर वेगवेगळ्या माध्यमातून ज्या बातम्या येत होत्या त्या देखील तिथे शेअर करत होतो . मुलांचे वसतिगृह क्रमांक -9 मधील लिफ्ट 7दिवस झाले बंद आहे . त्या बंद लिफ्टचा फोटो group मध्ये शेअर करून प्रश्न विचारलं म्हणून संबंधित group च्या अॕडमिन कडून दोन्ही विद्यार्थी प्रतिनिधीना group मधून काढून टाकण्यात आले . संबंधित अॕडमिन सुबोध मंडलीक यांना फोन द्वारे विचारणा केली असतात माझे बॉस अर्थात वसतिगृहप्रमुख प्रा. विकास मते यांच्या आदेशाने मी आपणांस काढून टाकले असे सांगितले .

 वरवर पहात ही गोष्ट सामान्य वाटत असली तरी अतिशय गंभीर स्वरूपाची आहे . वसतिगृह कार्यालयात चाललेला गैरप्रकार आम्ही सातत्याने बाहेर काढण्याचे काम करत आहोत . म्हणून अशा पद्धतीने हे लोक सुडबुद्धीने वागत आहेत . कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता group मधून काढून टाकले आहे . तसेच  आम्ही जे  विद्यार्थ्यांचे  प्रश्न विचारले त्याची  उत्तरे न देता हे लोक पळवाटा शोधत आहेत . 

                   राहुल ससाणे [ विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती ] 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने