ब्युरो टीम : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांमधील वस्तीगृह क्रमांक पाच गेले अनेक दिवस दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात आले होते. परंतु सध्या विद्यापीठात राज्यस्तरीय अधिवेशन चालू आहे . या अधिवेशनात सहभागी प्राध्यापक व इतर लोकांना वसतिगृह क्रमांक 5 मध्ये ठेवण्यात आले आहे . अनेक गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊन एक वर्ष उलटून गेले तरीदेखील त्यांना वसतिगृह मिळालेले नाहीत . विद्यार्थी वसतिगृहाची मागणी करण्यासाठी जातात तेव्हा त्यांना उडवाउडवीचे उत्तरे देऊन वसतिगृहप्रमुख हकलाऊन देतात . आणि दुसऱ्या बाजूस आपल्या पदाचा गैरवापर करत अशा पद्धतीने कार्यक्रमासाठी वसतिगृह वापरले जात आहेत . जे विद्यार्थी वसतिगृह अभावी आपले शिक्षण सोडून गेले आहेत त्यांच्या शैक्षणिक नुकसानास सर्वस्वी वसतिगृह प्रमुख जबाबदार आहेत . पदाचा गैरवापर करणाऱ्या वसतिगृहप्रमुखांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशा स्वरूपाची मागणी आम्ही कृती समितीच्या वतीने याअगोदर कुलगुरू आणि कुलसचिव यांच्याकडे केलेली आहे .
कोट -
१) विद्यापीठातील विविध विभागात आणि जयकर ग्रंथालय (नवीन इमारत) दोन दिवसापासून पाणी नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. एनएसएस च्या अधिवेशनस्थळी मात्र पाणी आहे. फुडकोर्ट कॅन्टीनमध्ये पाणी नाही आणि तिथले हॉटेलवाले पाणी बाटली विकत घ्यायला सांगत आहेत.
- बालाजी मिसाळ ( विद्यार्थी - संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग )
२) NSS चे राज्यस्तरीय अधिवेशन विद्यापीठात होत आहे ही चांगली गोष्ट आहे परंतु विद्यार्थ्यांच्या सेवासुविधांची कपात करून त्यांचा वापर अशा कार्यक्रमात करणे हे चुकीचे आहे . 5 नंबर वसतिगृहाचा गैरवापर सध्या चालू आहे . एकूणच सध्या विद्यापीठात विद्यार्थी हा केंद्रबिंदू न राहता इतर बाबींना जास्त महत्त्व आले आहे . याचा आम्ही विरोध व निषेध करतो .
राहुल ससाणे [ विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती ]
टिप्पणी पोस्ट करा