ब्युरो टीम: २०२२ - २३ या वर्षात मराठी विभागात पीएच . डी प्रवेशासाठी झालेल्या मुलाखतीमध्ये
गैरप्रकार घडला असून पात्र
विद्यार्थ्यांना जाणूनबुजून डावले गेले
असल्यास संबंधिच्या अनेक तक्रारी मुलाखत
देणाऱ्या विद्यार्थ्यांच्याकडून विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीस प्राप्त
झाल्या होत्या . प्राप्त तक्रारींचा विचार करता .
माहिती अधिकार (RTI ) च्या माध्यमातून माहिती मागितली होती . त्यासंबंधीचे
पहिले उत्तर प्राप्त झाले असून त्यामध्ये
अनेक प्रश्न निर्माण होत आहेत . लवकरच यामधील गोंधळ बाहेर काढण्याचे काम आम्ही
करू. मुलाखतीचा भाग असलेल्या अजून काही विद्यार्थ्यांना याविषयी काही तक्रारी असतील तर त्यांनी कृती समितीस संपर्क
करावा असे आवाहन कृती समितीचे
सदस्य राहुल ससाणे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा