Puneuniversity: पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले अनंतात विलीन



ब्युरो टीम: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम गोविंदराव ताकवले (90) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्‍चात मुलगा प्रशांत, सून आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. डॉ. ताकवले यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसस्कार करण्यात आले.

डॉ. ताकवले यांनी शालेय जीवनापासून राष्ट्र सेवा दल, समाजवादी विचारसरणी आणि महात्मा गांधी यांच्या “नई तालीम’चे तत्व स्वीकारल्याने याच मूल्यांचा त्यांनी जीवनभर अंगीकार केला. फर्गसन महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठात भौतिकशास्त्र विषयात शिक्षण घेतलेले ताकवले हे 1978 मध्ये पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्त झाले. ते भारतातील सर्वांत तरुण कुलगुरू होते.

दुसऱ्यांदा कुलगुरू…

डॉ. ताकवले यांनी 1988 ते 1989 मध्ये दुसऱ्यांदा पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविले. त्यांच्या पुढाकाराने 1989 मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठाचे ते संस्थापक कुलगुरू होते. 1996 ते 1998 या दरम्यान त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविले. त्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची (एमकेसीएल) निर्मिती झाली. त्यांनी राष्ट्रीय अधिस्वीकृती आणि मूल्यांकन परिषदेचे (नॅक) 2003 ते 2006 दरम्यान कार्यकारी अध्यक्षपद भूषविले. ताकवले यांना मुक्त व दूर शिक्षणात भरीव कामगिरी करणारी व्यक्ती म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरील “कॉमन वेल्थ ऑफ लर्निंग’ हा पुरस्कार मिळाला. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने त्यांना “जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविले आहे

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने