Rahul Gandhi : राहुल गांधींचा नव्या पासपोर्टसाठी कोर्टात अर्ज दाखल



ब्युरो टीम:  कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे खासदार म्हणून अपात्र ठरवले गेल्यानंतर त्यांनी आपला डिप्लोमॅटिक पासपोर्ट परत केला आहे. आता आपल्याला सामान्य पासपोर्ट मिळावा म्हणून त्यांनी येथील कोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या याचिकेवर कोर्टाने 26 मे रोजी सुनावणी ठेवली आहे.

सामान्य आणि नियमित स्वरूपाचा पासपोर्ट काढण्यासाठी त्यांना आता कोर्टातून ना हरकत दाखला घ्यावा लागणार आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात त्यांच्या विरोधात एक खटला सुरू असून त्या कोर्टातच त्यांनी हा अर्ज केला आहे.

अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी वैभव मेहता यांनी शुक्रवारी यावर सुनावणी ठेवली असून त्यावर कोर्टाने त्यांचे प्रतिवादी सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडून त्यांचे लेखी म्हणणे मागवले आहे. त्यानंतर कोर्ट राहुल गांधी यांच्या अर्जावर आपला निर्णय देणे अपेक्षित आहे.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. या खटल्यात न्यायालयाने 19 डिसेंबर 2015 रोजी गांधी आणि इतरांना या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने