Ranveersinh: रणवीर सिंहची 'पुष्पा 2' मध्ये एंट्री; साकारणार महत्वपूर्ण भूमिका



ब्यूरो टीम: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लु अर्जुन याच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाविषयी नवीन अपडेट समोर आली आहे. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह 'पुष्पा 2' मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'पुष्पा 2' मध्ये रणवीर पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. जो पुष्पराजची ओळख करून देईल. या चित्रपटात रणवीरची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. दिग्दर्शक सुकुमार हा चित्रपट मोठा करण्यासाठी त्यात अनेक कॅमिओ भूमिका आणणार असल्याचीही चर्चा आहे. इंडस्ट्रीतील बडे कलावंत या भूमिका साकारताना दिसणार आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने