Sawarkar: २८ मे ला 'स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवदिन' होणार साजरा; सावरकरांचा अभ्यासक्रमात समावेश करणार - राज्यपाल रमेश बैस



ब्युरो टीम:  कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलल्या वादग्रस्त विधानानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. यातच आता सावरकरांच्या कविता अभ्यासक्रमात आल्या पाहिजे, असे विधान राज्यपाल रमेश बैस यांनी केले आहे.

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराचे वितरण पार पडले. या वर्षीचा शौर्य पुरस्कार मेजर कौस्तुभ राणे, विज्ञान पुरस्कार अभय करंदीकर, समाजसेवा पुरस्कार मैत्री परिवार व स्मृतिचिन्ह पुरस्कार अभिवक्ता प्रदीप परुळेकर यांना देण्यात आला. यावेळी रमेश बैस बोलत होते.

रमेश बैस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याबाबत सांगताना काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. ‘वीर सावरकरांचे कार्य महान आहे. त्यांचे विचार उत्तुंग होते. सावरकर फक्त व्यक्ती नाही तर विचार आहेत. आपण सावरकरांचे अनेक प्रकारे वर्णन करू शकतो. त्यांनी देशासाठी दिलेलं योगदान प्रचंड मोठं आहे. काही वेळा त्यांच्या विरोधात लिहिले गेले. पण ते सगळं विसरून या ठिकाणी त्यांचे विचार पुढे घेऊन गेले पाहिजे. त्यासाठी सावरकर यांच्या विचारांचा प्रचार केला पाहिजे’, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले आहे.

पुढे ते म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. सावरकर स्मारकात विद्यार्थी आले पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हे स्मारक देशासाठी प्रेरणास्थान बनले पाहिजे. नाशिकच्या भगूर येथे सावरकरांचे भव्य स्मारक बनवण्याची गरज आहे. ने मजसी ने मातृभूमीला आणि जयस्तुते जयस्तुते या सावरकरांच्या कविता अभ्यासक्रमात आल्या पाहिजे.”

येत्या 28 मे रोजी सावकरांची 140 वी जयंती आहे. हा दिवस 'स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवदिन' साजरा करण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. त्याच दिवशी देशाच्या नव्या संसदेचं लोकार्पण होणार आहे, अशी माहिती सुद्धा राज्यपाल बैस यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने