Set-NetExam:यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 13 जूनपासून परीक्षा, अर्ज नोंदणी सुरू



ब्युरो टीम: देशभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप अॅण्ड असिस्टंट प्रोफेसर या पदांच्या भरतीसाठी जूनमध्ये घेण्यात येणाऱया यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) जाहीर केले आहे.

13 ते 22 जूनदरम्यान ही परीक्षा होणार असून परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 31 मे सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

विविध अभ्यासक्रमांच्या एकूण 83 विषयांची ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे. https://ugcnet.nta.nic.in/ या वेबसाईटवरून परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. एका विद्यार्थ्याला एकच परीक्षा अर्ज भरायचा असून एकापेक्षा जास्त अर्ज करणाऱया विद्यार्थ्यावर कारवाई करण्याचा इशारा एनटीएने दिला आहे. परीक्षेसंदर्भात काही अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी https://ugcnet.nta.nic.in/ या वेबसाईटवर किंवा 011 - 40759000 किंवा 011-69227700 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एनटीएने केले आहे.

खुल्या प्रवर्गासाठी जास्त परीक्षा शुल्क का?

यूजीसी नेट परीक्षेसाठी इच्छुक खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1 हजार 150 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे, तर ईडब्ल्यूएस, ओबीसी आणि एनसीएल प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क 600 रुपये एवढे आहे. एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि ट्रान्सजेंडर उमेदवारांकडून 325 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. मात्र या तुलनेत खुल्या प्रवर्गासाठी जास्त शुल्क का? असा सवाल या प्रवर्गातील उमेदवारांनी केला आहे.

 

असे आहे वेळापत्रक

 

ऑनलाइन परीक्षा अर्ज करणे - 31 मे, सायंकाळी 5 वाजेपर्यंत

 

परीक्षा शुल्क भरणे - 1 जून, रात्री 11.50 पर्यंत

 

परीक्षा अर्जातील चुका दुरुस्ती - 2 ते 3 जून, रात्री 11.50 पर्यंत

 

परीक्षा पेंद्र शहर जाहीर - जून पहिला आठवडा

 

हॉल तिकीट डाऊनलोड - जून दुसरा आठवडा

 

परीक्षा - 13 ते 22 जून

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने