sharadpawar: थेट अमित शाहांना टॅग करत शरद पवारांचं ट्विट; म्हणाले केलेले वर्तन वेदनादायी...



ब्युरो टीम: राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणारे कुस्तीपटू आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली आहे.

याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. दिल्लीत जंतरमंतरवर धरणं आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी पोलिसांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे.

या पार्श्वभूमीवर महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली आहे.कुस्तीपटूंवर पोलिसांनी जीवघेणा हल्ला केल्याचं तसेच वरिष्ठ एसीपी धर्मेंद्र यांनी जंतरमंतरवरुन निघून जाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनाही धमकावल्याचं या पत्रात म्हटले आहे.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ट्विट केलं आहे. शरद पवार म्हणाले की, आंदोलक महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ मोर्चा काढणाऱ्या दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या तरुणींवर दिल्ली पोलिसांनी केलेले वर्तन खूपच वेदनादायी आणि वाईट आहेत. शांततापूर्ण आंदोलनांवरील पोलिसांच्या क्रूरतेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि मी वैयक्तिकरित्या भारताच्या माननीय गृहमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन करतो. असे शरद पवार म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने