Southfilm: राजामौली-ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमावले 5 कोटी; 4k मध्ये झाला पुन्हा रिलीज



ब्युरो टीम:  एसएस राजामौली यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. पण 'स्टुडंट नंबर वन'च्या यशानंतर त्यांनी 2003 मध्ये एनटीआरसोबत बनवलेला चित्रपट सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला. तो चित्रपट होता 'सिम्हाद्री'.

नुकतंच सिम्हाद्री हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे तब्बल वीस वर्षानंतर देखील प्रदर्शित केल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

या चित्रपटाच्या रीलिजमध्ये महत्वाचा बदल करण्यात आला आहे. यावेळी राजामौली यांनी ‘सिम्हाद्री’ हा चित्रपट 4K मध्ये प्रदर्शित केला आहे. हा चित्रपट 20 वर्षांपूर्वी 8 ते 10 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला होता. 2003 मध्ये हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. ‘सिम्हाद्री’मध्ये ज्युनियर एनटीआरसोबत भूमिका आणि अंकिता मुख्य भूमिकेत आहेत. 20 वर्षांनंतर या चित्रपटाने पुन्हा एकदा सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

‘सिम्हाद्री’ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप प्रेम मिळत आहे. ‘सिम्हाद्री’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल पाच कोटींची कमाई केल्याचे समजते.जुन्या पिढीसह नवीन पिढी देखील या चित्रपटाला उदंड प्रतिसाद देताना दिसत आहे.

ज्युनियर एनटीआरच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आला आहे. फोरकेमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकही चित्रपटाला उदंड प्रतिसाद देताना दिसत आहे. बाहुबली आणि आरआरआरचे लेखक व्ही विजयेंद्र प्रसाद यांनी हा चित्रपट लिहिला होता. 20 वर्षांपूर्वी ‘सिम्हाद्री’ने 25 कोटींहून अधिक कमाई केली होती.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने