Thackeray Vs Rane : उद्धव ठाकरे – नारायण राणे आमने-सामने; उद्या बारसूत राजकीय संघर्ष पेटणार



ब्युरो टीम: कोकणातील प्रस्तावित बारसू सोलगाव येथे रिफायनरी प्रकल्प विरोधात स्थानिक आक्रमक आहेत. आंदोलनावर स्थानिक ठाम आहेत. सहा तारखेला आपण बारसूत जाणार असल्याचं याआधी उद्धव ठाकरेंनी घोषित केले होते. त्यामुळं त्यांचा हा नियोजित दौरा आहे. पण याचवेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील बारसूत जाणार आहेत,त्यामुळं एकाच दिवशी हे ऐकमेकांचे पक्के वैरी उद्या बारसूत भिडणार आहेत.

 मागील आठवड्यात भूसंपादनाच्या सर्वेक्षणास पोलीस बंदोबस्तात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजारो ग्रामस्थांनी वाट अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले होते. या भागात 31 मेपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, बारसू रिफायनरीवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. तसेच आरोप प्रत्यारोप केले जाताहेत. मविआच्या नेत्यांनी हे सरकार दडपशाहीचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. तर याचे राजकारण करु नका, असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आंदोलन पेटण्याची शक्यता असून, याचे तीव्र पडसाद उमटताहेत. तर अनेक नेते आज बारसूत येऊन गेले आहेत. तर दुसरीकडे उदया पुन्हा बारसूत राजकीय संघर्ष पाहयला मिळणार आहे.

दरम्यान, सहा तारखेला आपण बारसूत जाणार असल्याचं याआधी उद्धव ठाकरेंनी घोषित केले होते. त्यामुळं त्यांचा हा नियोजित दौरा आहे. पण याचवेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील बारसूत जाणार आहेत,त्यामुळं एकाच दिवशी हे ऐकमेकांचे पक्के वैरी उद्या बारसूत भिडणार आहेत. त्यामुळं उद्या पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पेटणार असून, राणे विरुद्ध ठाकरे असा सामना पाहयला मिळणार आहे. बारसूवरुन राणेंनी उद्धव ठाकरेंवर टिका केली आहे. मुख्यमंत्री असताना यांनीच या प्रकल्पाला पाठिंबा दिला होता. तसे पत्र देखील लिहिले होते. मात्र आता फक्त विरोधाला म्हणून विरोध करताहेत. असं नारायण राणेंनी म्हटलं आहे. याचा समाचार उद्धव ठाकरे घेणार का, हे पाहवे लागेल.

दरम्यान, कोकणात नाणार प्रकल्पाला देखील मोठा विरोध झाला होता. यावरुन राज्यकर्त्यांनी ऐकमेकांवर चिखलफेक केली होती. यानंतर आता नाणारला विरोध झाला म्हणून या ठिकाणी प्रकल्प उभारण्याची परवानगी मविआ सरकारच्या काळात देण्यात आली, असं सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी म्हटलं आहे. तसेच कोकणात अनेक प्रकल्पांना नेहमी विरोध का केला जातो. अशी देखील चर्चा सुरु आहे. नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प, एन्रॉन प्रकल्पांना झालेल्या विरोधानंतर राजापूर रिफायनरी प्रकल्पालाही बंद करा अशी मागणी आंदोलक करत आहेत.

महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर तसेच नाटे या परिसरात नियोजित आहे. कोकणात राजापूर बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग करणारी 'रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोलियम उद्योग' प्रस्तावित आहे. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळं आता हा प्रकल्प होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

कोकण निसर्गसौंदर्याने नटलेले असून आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागा टिकाव्यात ही स्थानिकांची भूमिका आहे. याशिवाय येथील रहिवाशांचा रोजगार मासेमारी हा असल्याने या तेलशुद्धीकरणाच्या प्रकल्पांमुळे समुद्रात गरम पाणी गेल्यानं मासे मरतील व जैवविविधतेवर धोका निर्माण होऊन त्याचा रोजगारावर परिणाम होईल. यामुळे ऊर्जा, पेट्रोलियम, तेलशुद्धीकरणाच्या प्रकल्पांना कोकणात विरोध होतो. तसेच रिफायनरीमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागांवरही परिणाम होईल असे आंदोलकांचे म्हणणे आहे

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने