thekeralastory: द केरळा स्टोरी हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावा – चित्राताई वाघ



ब्युरो टीम:'द काश्मीर फाइल्स' नंतर 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे. अनेक जण या चित्रपटाला विरोध करत आहेत तर अनेक प्रेक्षक हा चित्रपट पाहण्याची विनंती करत आहेत.

हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर देखील चांगलीच कमाई करताना दिसून येत आहे. या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 'द केरल स्टोरी' चित्रपटातून लव्ह जिहाद धर्मांतरण आणि दहशतवादाचा भयानक चेहरा समोर आला आहे.

जनतेत विशेष म्हणजे तरूणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण व्हावी यासाठी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने मी मुख्यमंत्री @mieknathshinde जी तसेच उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांना. - Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh)

या चित्रपटावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'द केरल स्टोरी' चित्रपटातून लव्ह जिहाद धर्मांतरण आणि दहशतवादाचा भयानक चेहरा समोर आला आहे. जनतेत विशेष म्हणजे तरूणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण व्हावी यासाठी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावा अशी विनंती केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने