UGC: विद्यापीठ,कॉलेज प्रवेशाबाबत सर्व माहिती आता उत्साह पोर्टलवर; विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) नवे पोर्टल



ब्युरो टीम: विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नवे वेब पोर्टल तयार केले असून ही नवीन वेबसाईट उद्या 16 मे रोजी लॉन्च होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक आराखडय़ानुसार हे वेब पोर्टल तयार करण्यात आले असून यावर विद्यार्थी, प्राध्यापकांना एका क्लिकद्वारे यूजीसी, विद्यापीठ, कॉलेजमधील विविध योजना, डिजिटल शिक्षण याविषयीची माहिती मिळणार आहे

यूजीसीचे अध्यक्ष प्रा.एम जगदीश कुमार यांनी सांगितले, या यूजीसीच्या वेबसाईटचे रिडिझाइन करण्यात आले असून ही वेबसाईट आता उत्साह (UTSAH- Undertaking Transformative Strategies and Actions in Higher Education) या नावाने ओळखली जाईल. उच्च शिक्षणाशी संबंधित योजना, प्रवेश प्रक्रिया, शुल्क, नोटीस, परिपत्रके पाहणे या वेब पोर्टलद्वारे सोपे होणार आहे. यूजीसी आता डिजिटल शिक्षणावरदेखील लक्ष केंद्रित करीत असून यासंबंधीची सर्व माहितीदेखील देण्यात येईल. एखाद्या विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्याला त्या विद्यापीठाविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर ती माहिती या वेबसाईटद्वारे मिळेल, असेही जगदीशकुमार म्हणाले.

प्राध्यापकांसाठी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस स्किम

देशभरातील विद्यापीठे आणि कॉलेजमध्ये इंजिनीअर, डॉक्टर, व्यावसायिक यांच्यासह इंडस्ट्रीजशी निगडित एक्सपर्ट प्राध्यापक बनून विद्यार्थ्यांना शिकवू शकतात. त्यासाठी यूजीसीने सप्टेंबर महिन्यात मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. आता यूजीसीने प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस स्किमचे खास पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर विविध क्षेत्रांतील तज्ञांची माहिती असेल. या पोर्टलवर तज्ञ आपला ईमेल आयडी व मोबाईल फोनद्वारे नोंदणी करू शकतात. नोंदणीनंतर शिक्षण, अनुभव आणि कार्यक्षेत्र यांची माहिती द्यावी लागेल. विद्यापीठ आणि कॉलेजनादेखील या पोर्टलवर नोंदणी करता येईल. त्यानंतर प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस या स्किमसाठी असलेल्या पदांची माहिती विद्यापीठांना भरावी लागेल. विद्यापीठाला पोर्टलवरून तज्ञ प्राध्यापकांची माहिती मिळेल. त्याद्वारे विद्यापीठांना त्यांची नियुक्ती करणे शक्य होईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने